BEED24

ऐतिहासिक किल्ला व निसर्गरम्य परिसराचे संवर्धन करावे पर्यटकांचे आवाहन…

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर)- अंबाजोगाई (Ambajogai) येथील शिवतेज ट्रेकर्सचे सदस्य अरुण शिंदे यांनी मुंबई (Mumbai) येथील ट्रेकर्स यांना किल्ले धारुर ऐतिहासिक किल्ल्या विषयी माहिती दिली. किल्ले धारूर (Kille Dharur) शहरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ला, अंबाचंडी देवी, सिताची न्हाणी या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी मुंबई-पुणे,अलिबाग, ठाणे, कल्याण या ठिकाणच्या ट्रेकर्स नी भेटी दिल्या. यावेळी धारुरकरांनी या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले.

किल्ले धारूर (Kille Dharur) शहर बालाघाटच्या डोंगररांगावर वसलेले असून या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ऐतिहासिक किल्ल्यात सर्व परिसर पाहून असलेला भुईकोट व गडकोट परिसर पाहिला. इतिहास कालीन सर्व माहिती करून घेतली. किल्ले धारुर शहराचे दैवत अंबाचंडी देवी येथे दर्शन घेऊन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. तसेच किल्ले धारुर शहराच्या पूर्वेला असलेल्या सिताची न्हाणी याठिकाणी या परिसराची पाहणी करून या ठिकाणचे डोंगराच्या कपारीतुन येणारे पाणी पिऊन स्वच्छ व शुद्ध पाणी असल्याचे सांगितले. यावेळी सर्व पर्यटकांनी निरोप घेताना शहरातील नागरिकांना एक आव्हान केले तुमचा परिसर हा ऐतिहासिक वैभव असलेला निसर्गरम्य परिसर आहे. या परिसराचे व ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करून पर्यटन वाढले पाहिजे या उद्देशाने सकारात्मक पावले उचलली पाहिजे व पुढील पिढीला हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यास मिळाला पाहिजे या उद्देशाने या परिसरातील नागरिकांनी कार्य करावे. यावेळी पर्यटनासाठी किरण आपटे (कल्याण), राजेश राईकर चौल (रेवदंडा, अलिबाग), रोहिणी तांडेल (माहिम, मुंबई Mumbai), गणेश सदगिर पट्टाकिल्ला (कसारा), अंजली स्वामी (दादर,मुंबई), सचिन कानडे (पिंपरी चिंचवड) हे आले होते. याप्रसंगी युथ क्लबचे अध्यक्ष सुरेश शिनगारे, जलदुत विजय शिनगारे, कपिल समर्थ यांनी या पर्यटकांसोबत फिरुन माहिती सांगितली.

Exit mobile version