farmer suicide… धारुर तालुक्यात पुन्हा तरूण शेतकऱ्याची आत्महत्या; आत्महत्येची शृंखला सुरुच.

किल्लेधारूर दि.27 नोव्हेंबर – farmer suicide… धारुर Dharur तालुक्यात शेतकरी आत्महत्येची शृंखला सुरुच असून रविवारी तालुक्यातील भोगलवाडी येथील तरूण शेतकरी बळीराम सिताराम तिडके (वय 42) वर्ष या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थीती व कर्जामुळे सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या suicide केली.
दि.24 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अंबेवडगाव येथे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा तरुण शेतकऱ्याने गळफास लावला आहे. धारुर Dharur तालुक्यातील भोगलवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी बळीराम सिताराम तिडके यांनी रविवारी सकाळी अकराव्या दरम्यान राहत्या घरात कर्जाला व दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली. भोगलवाडी व नित्रुड येथे सदर शेतकऱ्याची अल्पशी जमीन असून त्याच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परीवार आहे. या आकस्मात मृत्यूची नोंद धारूर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यात शेतकरी आत्महत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटने बद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.