
बीड दि.15 सप्टेंबर – Holiday notice सोमवारी बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजला असून अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाना सुट्टी जाहिर केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार जिल्ह्यात दि.14 पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच अतिवृष्टीमुळेआपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दि.16 सप्टेंबर मंगळवार रोजी सुट्टी जाहिर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला.



