गृहमंत्री अनिल देशमुखांना अभय … शरद पवार यांची घोषणा

दिल्ली दि.22 मार्च – परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या विषयावर मोठी घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली असुन परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी पत्रात दिलेली माहितीच खोटी असून त्यांनी दिलेल्या तारखांत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) स्वतः कोरोना बाधित असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते असा दाखला देत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.

(Home Minister Anil Deshmukh to Abhay … Sharad Pawar’s announcement)

दिल्ली येथील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी सध्या पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी परमबीर सिंहाच्या आरोपात तथ्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले. परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी आपल्या पत्रात ज्या तारखेला सचिन वाझे यांची अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी भेट झाल्याचे सांगितले त्या तारखेस देशमुख हे कोरोना बाधित असल्याने 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते.

सदरील प्रकार हा तपासाची दिशा बदलण्यासाठी केला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसने योग्य दिशेने केल्याचे त्यांनी सांगत हा सर्व प्रकार लक्ष विचलित करण्यासाठी केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची असून परमबीर सिंह यांची माहितीच खोटी असल्याने राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे तुर्तास तरी अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असून यानंतर कोणत्या घटना घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!