किराया मागितला म्हणून घर मालकास जीवे मारण्याची धमकी…

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) घराचे मागील सहा महिन्याचे थकित घर भाडे मागणाऱ्या घर मालकास किरायदाराने घर भाडे देत नाही असे म्हणत जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली असून या बाबत गंगासागर भिमराव काळे यांच्या फिर्यादी वरुन धारुर पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, गंगासागर भिमराव काळे यांनी तीन वर्षां पूर्वी केज तालुक्यातील आडस गावात बांधलेले घर विकत घेतले. या घरातील तीन रुम मागील सहा महिन्यापर्वी नितीन नागनाथ आकुसकर यांना भाड्याने दिल्या. अनेक दिवसांपासून त्यांना भाडे मागितले असता ते भाडे देण्यासाठी टाळाटाळ करत असत. २१ तारखेला पुन्हा भाड्याचे पैसे ची मागणी करा किंवा घर खाली करा म्हणून सांगितले असता तुला काय करायचे तर कर असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली. या वरून गंगासागर भिमराव काळे यांच्या फिर्यादी नुसार आरोपी नितीन नागनाथ आकुसकर यांच्या विरोधात कलम ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस (Police) निरक्षक सुरेखा धस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!