आज कशी आहे बीड जिल्ह्याची कोरोना स्थिती? धारुर 68, केज 151… पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.4 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4842 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1499 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3343 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आरटीपिसीआर तपासणी अहवालाची प्रतिक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड येथे स्वतंत्र तपासणी लॕबची घोषणा झाल्याने अहवाल लवकर येणे अपेक्षित असताना अहवाल मिळायला विलंबच होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार आज 1011 रुग्णांची बरे होवुन सुट्टी झाली आहे.
(How is the Corona status of Beed district today? See Taluka wise statistics.)
आज पन्नासाव्या दिवशी बीड तालुक्यात 381 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 212, आष्टी तालुक्यात 58 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 68 तर केजमध्ये 216 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-381, अंबाजोगाई-212, आष्टी-58, धारुर-68, गेवराई-119, केज-151, माजलगाव-68, परळी-126, पाटोदा-59, शिरुर-206, वडवणी-51 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात उद्रेक दिसून येत आहे. राज्यासह देशात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजाराच्या पुढे येत आहे. यामुळे जिल्ह्यात मोकार फिरणाऱ्यासाठी केज, बीड व अंबाजोगाई येथे ॲन्टीजन चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात पुढचे तीन दिवस बुधवार, गुरुवार व शुक्रवारी कडक निर्बंध असणार आहेत.
दरम्यान, राज्यात काल 48 हजार 621 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचे निदान झाले. तर 59, 500 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्णांना उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. राज्यात काल दिलासादायक चित्र दिसून आले. नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे.