हुंडा एकीचा लग्न दुसरीशी; वैद्यकीय अधिकाऱ्यावर परळीत गुन्हा नोंद.

बीड दि.19 जून – तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला (Latur) हॉस्पिटल (Hospital) टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर मात्र त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा परळी शहर पोलिस (Police) ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

(Hunda Eki’s marriage to another; Recorded crime against medical officer.)

डॉ. संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमेश्वर नगर, परळी) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे (medical officer) नाव आहे. तो सध्या लातूर (Latur) जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गतवर्षी 18 सप्टेंबर रोजी संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल (Hospital) टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली.

मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. 23 सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. 21 ऑक्टोबर रोजी मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न यावर्षी 5 मे रोजी करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले.

मात्र, 23 मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर 4 एप्रिल रोजी संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाल्याचे व्हाॅट्सॲपवर व्हिडीओ क्लिपमध्ये सांगून या लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर परळी शहर पोलिस (Police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

व्हिडीओद्वारे आरोप करून बदनामी…
केवळ लग्नास नकार देऊन संदीप शांत बसला नाही. माझे लग्न झाल्याचे सांगूनही माझा पाठलाग करण्यात येत आहे, लग्नासाठी माझ्या कुटुंबावर दबाव आणत आहेत अशा आरोपांचा व्हिडीओ करून तो नातेवाईकात पाठवून मुलीची आणि तिच्या वडिलांची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!