पती पत्नीसह एकाचा नदीत बुडून मृत्यू; वडवणी तालुक्यातील धक्कादायक घटना.

वडवणी दि.2 एप्रिल – वडवणी (Wadwani) तालुक्यातील कवडगाव येथे सेल्फी घेण्याच्या नादात पती पत्नीसह एकाचा बुडून मृत्यू (drowned in river) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सुदैवाने दोन बालकं बचावली आहेत. पोलिसांनी (Police) तिघांचे शव बाहेर काढले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कवडगाव ता.वडवणी येथील एका खाजगी उर्दू शाळेतील शिक्षक यांचे मुलगी व जावाई कवडगावला आले होते. दुपारच्या जेवणानंतर चारच्या सुमारास जावाई पत्नी, दोन लहान बालकं व मित्रासह नदीवर गेले होते. यावेळी आपले फोटो काढण्यात मग्न होते. यावेळी सोबतचे दोन बालकं पाण्यात गेली. त्यांना बाहेर काढत असताना पाण्यात तोल गेला.
नदी पात्रात वाळू उपशामुळे मोठे खड्डे झालेली आहेत. बालकं बाहेर आली मात्र तिघांना पोहता येत नसल्याने खोल पाण्यात बुडाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतात तहा शेख (वय 22) , शेख सिद्दीक (वय 22) दोघे रा. ढाकरगाव ता.अंबड व शदाब (वय 25) रा. बिहार ह.मु. ढाकरगाव यांचा समावेश आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतांचे शव बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवली आहेत. या घटनेमुळे कवडगाव गावात शोककळा पसरली आहे.
Husband and wife drowned in river; Shocking incident in Wadwani taluka.