BEED24

पती विरहाने पत्नीची मुलीसह आत्महत्या; केज तालुक्यातील घटना.

बीड दि.17 सप्टेंबर – कोरोनाने (Corona) निधन झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना केज (Kaij) तालुक्यात उघडकीस आली आहे. आपल्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. केज तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(Husband commits suicide with wife’s daughter; Incidents in Kaij taluka.)

मागील दोन वर्षात कोरोना आपत्तीने (Corona outbreak) अनेक संसार उध्वस्त केली. अनेक बालकांनी आपल्या आई वडीलांचे छत्र हिरावले तर अनेकांना आई किंवा वडील नियतीने हिरावल्याचे दिसुन येते. तर अनेकांनी आपल्या जोडीदार गमावल्याच्या घटना आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही अशा घटना घडल्या आहेत. यातच पती विरह सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पती विरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तिच्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली आहे. माहेरी येऊन सदरील शिक्षिकेने टोकाचे पाऊल उचलले.

लेकीसह केली आत्महत्या
शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. राजाभाऊ आणि शीतल जाधवर हे दोघेही पती पत्नी पुणे येथे पेशाने शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या शिक्षिका पत्नीने आपल्या मुलीसह माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Exit mobile version