बीड जिल्ह्यातील शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; पालकांचा संभ्रम होणार दूर ….

बीड दि.21 जानेवारी – राज्य शासनाने सोमवार दि.24 पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची घोषणा केली आहे. जिल्ह्यात पुढील आठवड्यापर्यंत केवळ 10 वी व बारावीचे वर्ग सुरु ठेवण्याची सुचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Radhabinod Sharma) यांनी दिल्याचे सुत्रांकडून कळते.
(Important decision regarding schools in Beed district; Parents will be confused ….)
राज्य शासनाने राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave) पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपर्यंत दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, शाळा व महाविद्यालय बंदच्या निर्णयासह निर्बंध (restrictions) कडक केले आहेत. यातच काल राज्य शासनाने कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात सोमवारपासून (दि.24) शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील पालकांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागून आहे. आज दि.21 शुक्रवारी जिल्हाधिकारी (Collector) राधाबिनोद शर्मा यांनी आरोग्य विभागाकडून जिल्ह्याचा आढावा घेवून माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Education Department) वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली.
बीड जिल्ह्यात सोमवारपासून (दि.17) कोरोना बाधितांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे तुर्तास पुढील आठवड्यापर्यंत शाळा बंदचा निर्णय जैसे थे राहणार असून दहावी व बारावीचे वर्ग मात्र सोमवारपासून सुरु करण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट आदेश काढण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत चालू आठवड्यात सलग मोठी वाढ दिसून येत आहे. आज सर्वाधिक बाधित बीड तालुक्यात आढळून आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात 205, गुरुवारी 239 तर आज (दि.21) 295 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बीड तालुक्यात 113 तर परळी तालुक्यात 59 रुग्ण आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या आजच्या (दि.21) नोंदीनूसार 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1129 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 12.39 टक्के झाला आहे. हजाराच्या पुढे ॲक्टीव रुग्ण झाल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.