आरोग्य

poisoning पितृपक्षाच्या कार्यक्रमात 23 जणांना विषबाधा ; उंदरी गावातील प्रकार.

66 / 100

किल्लेधारुर दि.21 सप्टेंबर – poisoning केज तालुक्यातील उंदरी या गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केज तालुक्यातील उंदरी येथे ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून 23 जणांना विषबाधा झाली. तात्काळ बाधित रुग्णांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. गोरख मोरे, डॉ. विजयकुमार सूळ , डॉ. परवेज शेख , डॉ. दत्तात्रय जाधव यांनी रुग्णांवर उपचार केले. सर्व विषबाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!