धारुरमध्ये आजची कोरोना स्थिती… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर)- आजची संख्या समाधानकारक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १४ संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळ एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या ५ स्वॅब पैकी १ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळला आहे. एकंदरीत आज कोरोना बाधितांची संख्या आवाक्यात असल्याचे दिसुन येते.
३१ जुलै २०२० पासून शहरात दररोज कोरोना (Corona) बाधितांची संख्या आढळून येत आहे. सदरील संख्येत दररोज वाढता आलेख आढळून येत होता. गेल्या तीन दिवसात संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत होते. आज १४ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात एक पॉझिटीव्ह आढळला तर ५ स्वॅब (Swab) नमुन्यात एकाचा पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला आहे. अशी आज वाढलेली संख्या कमी होत २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली. आज आढळून आलेले दोन्ही रुग्ण शहरातील आहेत.
स्वॅब (Swab)
४१ वर्षीय पुरुष, आयोध्या नगर, धारुर
ॲन्टीजन (Antigen)
६० वर्षीय स्त्री, लोणार गल्ली, धारुर
यांचा समावेश आहे.