महत्त्वाची बातमी … आजपासून एलआयसीत होणार मोठा बदल;

नवी दिल्ली 10 मे – सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance Company) असणाऱ्या भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये एक मोठा बदल होवून नवे नियम सोमवार 10 मे पासून लागू होणार आहेत. एलआयसी (Life Insurance Corporation) कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, 10 मे पासून त्यांची सर्व कार्यालयं आठवड्यातून पाच दिवस काम करतील.

(Important News … Big change in LIC from tomorrow;)

शनिवारी देखील आता एलआयसी (Life Insurance Corporation) मध्ये साप्ताहिक सुट्टी असेल. कंपनीने एका सार्वजनिक नोटीसमध्ये असं म्हटलं आहे 15 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारच्या अधिसुचनेनुसार विमा कंपनीसाठी शनिवारला देखील साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विमा कंपनी (LIC) ने नोटीस जारी करत दिली सूचना
भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने एक अधिकृत नोटीस जारी करत या निर्णयाबाबत सूचना दिली आहे. या नवीन वर्क कल्चरनुसार 10 मे पासून विमा ऑफिस आठवड्यातील पाच दिवस, सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू असतील.

pic.twitter.com/q8ScDxzpJb
– LIC India Forever (@LICIndiaForever) May 7, 2021

ऑनलाइन पूर्ण करा कामं
एलआयसी कडून त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सुविधा देखील पुरवली जाते. तुम्ही https://licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर बहुतांश कामं पूर्ण करू शकता. याशिवाय एलआयसीने कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) ग्राहकांची असुविधा लक्षात घेता क्लेम्सबाबत असणाऱ्या अटी शिथील केल्या आहेत.

एलआयसी च्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
याशिवाय एलआयसी च्या कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळेल. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने वेतन संशोधन बिलला मंजुरी दिली आहे. या सुधारणेमुळे एक लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकामध्ये 16 टक्के वाढ नमुद करण्यात आली आहे. अहवालात हे देखील नमुद करण्यात आले आहे की एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक विशेष भत्ता देखील दिला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!