महाराष्ट्र

Shooting Competition धारुरची जागृती करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व.

56 / 100

किल्लेधारुर दि.15 अॉगस्ट – Shooting Competition 10 व्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेसाठी धारूरची Dharur नेमबाज जागृती तिवारी हिची महाराष्ट्र संघात निवड झाली. दि.18 ते 29 अॉगस्ट 2023 दरम्यान अहमदाबाद, गुजरात येथे या स्पर्धा होत आहेत.

दिनांक 18 ते 29 ऑगस्ट दरम्यान अहमदाबाद , गुजरात येथे होणाऱ्या 10 व्यां पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेसाठी Shooting Competition धारूरची Dharur उद्योनमुख पिस्तूल नेमबाज जागृती अमरजीत तिवारी हिची एअर पिस्तूल सब युथ गटात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे . या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा , दादरा नगर हवेली, दिव व दमण या राज्यामधून सुमारे 1800 रायफल व पिस्तूल नेमबाज सहभागी होणार आहेत. जागृतीने राज्य नेमबाजी स्पर्धेमधून Shooting Competition खूप कमी कालावधीत चांगली कामगिरी करत या स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती या स्पर्धेसाठी धारूर Dharur वरून औरंगाबादला Aurangabad येऊन अजिंठा नेमबाजी केंद्रात प्रशिक्षक संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ते 3 तास सराव करते. तिचे औरंगाबाद Aurangabad जिल्हा रायफल संघटनेचे अध्यक्ष व पोलीस आयुक्त मनोज लोहिया, संघटनेचे पदाधिकारी अनंत बर्वे, मनीष धूत, उमेश पटवर्धन, हेमंत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!