शनिवारी किंचित वाढ…बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.3 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3852 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 120 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3732 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अनुक्रमे 103 व 111 अशी संख्या आली होती.
(Today’s corona update in Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-14, अंबाजोगाई-5, आष्टी-33, धारुर-7, गेवराई-16, केज-6, माजलगाव-6, परळी-8, पाटोदा-8, शिरुर-7, वडवणी-10 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात दररोज शंभर तर दोनशेमध्ये संख्या स्थिरावली आहे. परवा ही संख्या 103 तर काल 111 वर होती. राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात शनिवारी 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजारांच्या जवळ आली आहे. शनिवारी राज्यात 156 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 60 लाख 79 हजार 352 रुग्ण आढळून आले आहेत.