बीड जिल्ह्यात दोघांचा पाण्यात पडून मृत्यू ; माजलगाव व परळीतील घटना.

49 / 100 SEO Score

बीड दि.26 जुलै – बीड जिल्ह्यात दोघांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटना सोमवार दि.25 रोजी घडल्या. माजलगाव येथे सिंदफना नदीच्या पाण्यात पडून 15 वर्षीय किशोरवयीन मुलाचा तर परळीत नागापुर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

वलिद नासेर (अल्सारी) चाऊस वय 15 वर्षे राहणार पाटील गल्ली हा मुलगा सकाळी साडेदहा वाजता जुन्या शहरातील सिद्धेश्वर मंदिरा जवळून वाहणाऱ्या सिंदफणा नदी पात्रात पडल्याची माहिती परिसरात पसरली . त्यानंतर परिसरातील तरुणांनी नदीपात्रात त्याची शोध मोहीम राबवली. बारा वाजण्याच्या दरम्यान तो मृत अवस्थेत आढळुन आला . दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. या मृत्यू बाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नागापूर धरणात युवक बुडाला
परळी तालुक्यातील नागापूरचे वाण धरण तुडुंब भरून वाहवू लागले आहे. सोमवारी पोहण्यासाठी गेलेला एक युवक धरणात बुडाला आहे. तालेब पठाण पिता नूर पठाण(वय 20 वर्षे) राहणार इंदिरानगर परळी असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील हा युवक सोमवारी दुपारून पोहण्यासाठी एम एच 20 के 7392 सिटी हंड्रेड मोटरसायकल ने नागापूर धरण येथे गेला होता. पोहत असताना तो नागापुर धरणामध्ये बुडाला. तलाव पूर्ण भरून उलटत असल्यामुळे शोध कार्यास अडथळा येत होता. घटनास्थळावर परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी भेट दिली. नागापूर धरण परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

( Two died after falling into water in Beed district; Incidents in Majalgaon and Parli. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!