शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…. देशात चालणार सीएनजी ट्रॅक्टर…. आज केंद्रीय मंत्री गडकरी करणार शुभारंभ

नवी दिल्लीः दि.१२- दिवसेंदिवस डिझेल व पेट्रोलचे दर गगनाला भिडत असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर सीएनजीवर चालविण्यात येणार आहे. आज शुक्रवार दि.१२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला आणि जनरल (सेवानिवृत्त) व्ही. सिंग यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे. रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टॉमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरच्या प्रयोगानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यात आणि ग्रामीण भारतात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होवून उत्पादन वाढीस मदत होणार आहे.
(Big news Indias first CNG Tractor to be launched Friday could save rs one lakh annually on fuel costs for farmers)
काय होईल फायदा…
सीएनजी ट्रॅक्टरमुळे (CNG Tractor) शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. सीएनजी (CNG) हे एक स्वच्छ इंधन आहे, त्यात कार्बन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण कमी असून हा गैर- संरक्षक, जाड आणि कमी प्रदूषण करणारा आहे, यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत स्वस्त आहे, कारण सीएनजीचे दर पेट्रोलच्या किमतीतील चढउतारांपेक्षा अधिक कमी आहेत. सीएनजी वाहनांचे सरासरी मायलेजदेखील डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगले असते. तसेच हे खूप सुरक्षित आहे, कारण सीएनजी (CNG) वाहनांमध्ये सीलबंद टाक्या असतात, ज्यामुळे रिफ्युएलिंग किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी असते. यात भविष्यात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील पराली म्हणजेच गवताचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत: च्या क्षेत्रात बायो-सीएनजी युनिट्स तयार करण्यास मदत होईल. शेतकर्यांना सीएनजी ट्रॅक्टर (CNG Tractor) वापरल्यास इंधनाच्या किमतीवर वर्षाकाठी एक लाख रुपयांहून अधिक बचत करण्याचा शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त त्यांचे जीवनमान सुधारण्यात देखील मदत होईल. आजवर सीएनजीचा वापर करुन अनेकांनी खर्चात बचत केली असून शेतकऱ्यांच्या जीवनातही सीएनजी ट्रॅक्टरमुळे क्रांती होणार आहे. देशातील पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचा शुभारंभ आज शुक्रवार दि.१२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला आणि जनरल (सेवानिवृत्त) व्ही. सिंग यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत आहे.
(Big news Indias first CNG Tractor to be launched Friday could save rs one lakh annually on fuel costs for farmers)