जो बायडन.. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प तात्यांना अखेर धक्का

न्यूयॉर्क: दि.८- जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन Joe Biden यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आपल्या वादग्रस्त शैलीमुळे सतत चर्चेत असणारे डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांना लोकांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन Joe Biden अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर पेनसिल्वेनिया मधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन Joe Biden यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते. महत्त्वाचं म्हणजे ओबामा यांनी ‘अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती’ असा त्यांचा उल्लेखही केला होता. जो बायडेन Joe Biden हे बराक ओबामा यांचे अत्यंत जवळचे समजले जात. या निवडणुकीत तर ओबामा यांनी बायडेन यांचा प्रचारही करत असल्याचे दिसत होते.
बायडन Joe Biden यांनी विजय मिळवलेले राज्य
वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँड
Joe Biden .. the new president of the United States; Donald Trump finally pushes Tatya