आज 107 .. बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.17 अॉगस्ट – सोमवारी कोरोना बाधितांची संख्या शतकाच्या आत आली. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 4617 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 107 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4510 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-5, आष्टी-23, धारुर-5, गेवराई-3, केज-19, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-10, शिरुर-6, वडवणी-10 अशी आहे.
बीड जिल्ह्यात दि.16 रोजी पाच महिन्यातील सर्वात कमी व दिलासादायक आकडेवारी दिसून आली. दिडशेहून पुढे असलेली बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात शंभर ते दिडशेच्या आत आहे. दरम्यान, नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी दि.15 पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केली असून तपासणी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी 04 हजार 145 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 05 हजार 811 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 95 हजार 744 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.86 टक्के झाला आहे.
गेल्या 24 तासात 100 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.11 टक्के आहे. राज्यात सध्यात 62 हजार 452 सक्रीय रुग्ण आहेत.