गेवराई/अंबाजोगाई दि.5 अॉक्टोंबर – गेवराई (Gevrai) तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या (Police station) हद्दीतील सेलू मारफळा येथील अशोक सखाराम माने (वय 32) यास आज पहाटे अज्ञात वाहनाने उडविले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) प्रताप नवघरे, उपनिरीक्षक सुभाष माने, बीट अंमलदार उद्धव राऊत, भरत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
(In Ambajogai, a two-wheeler and a car collided head-on, while in Gevrai, an unidentified vehicle blew up one.)
पोलिसांना (Police) त्या व्यक्तीची ओळख पटत नसल्यामुळे त्यांनी तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांना व्हाट्सअपच्या माध्यमातून ओळख पटवण्याचे आवाहन केले होते. काही तासातच ही व्यक्तीची सेलु मारफळा येथील आहे अशी माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले. प्रेत शवविच्छेदनासाठी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आले.
अंबाजोगाईत दुचाकी व कारची समोरासमोर धडक
अंबाजोगाई – लातूर रोडवरील सेलूअंबा टोल नाक्यावर दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) एक जण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि.4) सायंकाळी ७ वा. झाला. जखमीवर स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाता विषयी प्राप्त माहिती अशी की, काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई लातूर रोड वरील सेलू अंबा टोलनाका नजीक लातूर कडुन बीड कडे निघालेल्या एम एच 23 बी सी 2111 क्रमांकाच्या महेंद्रा केयूव्ही 500 या गाडीची व अंबाजोगाई (Ambajogai) कडून एम एच 23 के 1151 क्रमांकाच्या स्प्लेडर या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीवर आपल्या गावी निघालेले पोखरी येथील रहिवासी व येथील महालक्ष्मी ट्रॅक्टरच्या मालकाचे बंधु फरशीचे कारागीर सुहास निकम व त्यांचे चुलत बंधु राजाभाऊ निकम यांची समोरासमोर धडक होऊन सुहास निकम हा जागीच ठार झाला तर राजाभाऊ निकम हा गंभीर जखमी झाला. राजाभाऊ निकम याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असुन घटनेचे वृत्त समजताच पो. नि. (Police Inspector) मोरे, पो. उ. नि. (PSI) केंद्रे, पो ना चौरे, पो हे कॉ नाना राउत यांनी घटनास्थळी धाव घेतली.