बीडमध्ये आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह जि.प. सभापती जयसिंग सोळंके कोरोना पॉझिटीव्ह

बीड/आष्टी– दि.16 मार्च – दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बीड जिल्ह्यातही कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या झपाट्याने वाढली आहे. आज मंगळवार दि. १६ मार्च रोजी आष्टी मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे (Balasaheb Aajbe) यांची अँटिजन (Antigen) चाचणी पॉझिटिव्ह आली असून, गेल्या चार दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आ. आजबे यांनी केले आहे. तर बीड जिल्हा परिषदेचे (Beed Z.P.) अर्थ, बांधकाम व नियोजन सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke) हे देखील गृह विलगीकरणात आहेत.

(In Beed, MLA Balasaheb Ajbe and ZP. Speaker Jaysingh Solanke Corona Positive)

बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हाभर कोरोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी अँटिजन (Antigen) चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Aajbe) यांनी अँटिजन टेस्ट केली. या टेस्टमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, गेल्या चार दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आ.आजबे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सर्दी असल्याने, बाळासाहेब आजबे यांची त्यांच्या शिराळ येथील निवासस्थानी आज आरोग्य विभागाच्या वतीने टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, माझी तब्येत चांगली आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आ. बाळासाहेब आजबे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्हा परिषदेचे (Beed Z.P.) अर्थ, बांधकाम व नियोजन सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समाजमाध्यमातून समोर आले आहे. सध्या ते गृह विलगीकरणात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जिल्ह्यात आजही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढली असून लोकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!