कोरोंना विशेष

रिपोर्ट आले… धारुरमध्ये आज आढळले एवढे रुग्ण…..पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये १२ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. तर काल पाठवलेली ५५ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. सध्या शिक्षकांच्या आरटीपिसीआर चाचण्या होत असल्याने तपासणी संख्या वाढली आहे. आजच्या स्वॅब नमुन्यात ४३ शिक्षकांचा समावेश होता. ती सर्व निगेटिव्ह आली आहेत.

हळूहळू जनजीवन पुर्वपदावर आले आहे. तुरळक प्रमाणात पॉझिटीव्ह Positive रुग्ण येण्याची शृंखला सुरुच आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये केवळ १२ ॲन्टीजन Antigen तपासण्या करण्यात आल्या. या पैकी २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली. काल ५५ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. ती सर्व निगेटिव्ह आली आहेत. आज तब्बल ८६ जनांचे स्वॅब (Swab) तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन Antigen तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ५३ वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी, ता.केज

२. ४५ वर्षीय स्त्री, शिक्षक कॉलनी, ता.केज

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!