BEED24

धारुर शहरात युवकाची बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या.

किल्ले धारूर दि.25 एप्रिल – धारुर (Dharur) शहरातील शेतात राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाने तेलगाव रोडवरील डोंगरावर लिंबाच्या झाडाला कंबरेच्या बेल्टने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 25 एप्रील रोजी उघडकीस आली. मनोज कुलकर्णी असे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील युवक मनोज कुलकर्णी (वय 26 वर्ष) हा ट्रॅक्टर चालक होता. आठ दिवसाखालीच तो कर्नाटक येथून ऊस तोडणी करुन करखान्यावरून परत आला होता. अतिशय मेहनती व मायाळू असल्याने परिसरात मनोजची आत्महत्या (Suicide) झाल्याचे कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज सकाळी घराच्या बाहेर पडला होता.

आज दि.25 सोमवारी सायंकाळच्या सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास युवक मनोज कुलकर्णी (वय 26 वर्षे) याने तेलगाव रोड वरील लिंबाच्या झाडाला कंबरेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटना समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखाल झाले होते. ग्रामीण रुग्णालय धारूर येथे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धारूर पोलीस (Police) करत आहे.

( In Dharur, a youth committed suicide by hanging himself with a belt. )

Exit mobile version