BEED24

अमेरिकेतील अंबाजोगाईच्या त्या संशयास्पद मृत्यूची धक्कादायक माहिती समोर; अमेरिकन मीडियानूसार पतीने पत्नीला भोसकले.

बीड दि.9 एप्रिल – अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी (7 एप्रिल) रात्री अमेरिकेत (US America) झालेल्या संशयास्पद मृत्यूचा धक्कादायक खुलासा अमेरिकन मीडीयाने केला आहे. पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीला भोसकुन ठार (Murder) करत स्वतःला संपवले (suicide) असल्याचे अमेरिकन मिडियाने (American media) पोलिसांच्या हवाल्याने वृत्त प्रकाशित केले असल्याचे एका आघाडीच्या भारतीय वृत्तवाहिनीच्या पोर्टल आवृत्तीत वृत्त प्रकाशित झाले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. या गुढ मृत्यूमुळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

(In front of the shocking news of that suspicious death of Ambajogai in America; According to American media, the husband stabbed his wife.)

अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा मुलगा बालाजी हे आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने सहा वर्षापूर्वी अमेरिकेत (US America) न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते. मात्र, बुधवारी बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) यांचे अमेरिकेत त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून (Bodies found) आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते.

बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत असल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांनी तेथील पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून (Bodies found) आले होते.

भारतीय वेळेनुसार गुरूवारी (दि.8) सकाळी 9 वाजता अमेरिकन पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली.
दाम्पत्याच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे कारण समजू शकले नव्हते. यातच अमेरिकन मीडियाने सदरील प्रकरणी धक्कादायक खुलासा पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार केला आहे. अमेरिकन मीडियाच्या (American media) वृत्तानुसार बालाजी रुद्रवार यांनी धारदार शस्त्राने पत्नी आरती हिचा भोसकुन खुन (Murder) केला. जीव वाचवण्यासाठी आरती यांनी पळ काढला. मात्र याचवेळी पोटात धारदार शस्त्र भोसकल्याने त्या जागिच कोसळल्या.

यानंतर बालाजी यांनी स्वतःवर वार (suicide) करुन संपवल्याचे वृत्तात सांगितले आहे. या हल्ल्यात मात्र त्यांची चार वर्षाची चिमुकली सुखरुप बचावली. आरती या सात महिन्याच्या गर्भवती होत्या अशीही माहिती समोर आली आहे. बचावलेली चिमुकली सध्या बालाजी यांच्या मित्रांकडे आहे. या प्रकरणाचा न्यू जर्सी पोलिस कसुन तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर याबाबतचा अधिकृत खुलासा होईल. सर्व तपास पुर्ण झाल्यानंतर मयतांचे शव नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. यासाठी 8 ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Exit mobile version