केज पोलिस ॲक्शन मोडमध्ये, 13 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल; धारुरात मात्र प्रशासनाची चुप्पी.

केज/किल्लेधारूर दि.६ – संपूर्ण राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत संचारबंदीचा आदेश सोमवारी लागू झाला. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी केज पोलीसांनी ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईचा बडगा उभारला. केज पोलीस स्टेशन हद्दीतील काही व्यावसायिकांनी आदेश डावलून दुकाने व व्यवसाय सुरू ठेवल्याने 13 जणांवर केज पोलिसांनी (Kaij Police) दंडात्मक कारवाई केली. किल्लेधारूर शहरात मात्र पोलीस अथवा महसुल प्रशासनाने कसलीही भुमिका दाखवलेली नसून अनेक प्रतिबंधित व्यवसाय सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
(In Kaij Police Action Mode, 13 professionals charged; In Dharur, however, the administration is silent.)
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे राज्य शासनाने दि.5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्या पासून राज्यभर रात्रीची संचारबंदी (Night curfew) व सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवा अंतर्गत आस्थापना सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व महसुल प्रशासनाला आदेशित केले आहे.
केज पोलीस (Kaij Police) स्टेशन हद्दीत याची अंमलबजावणी करण्यास पोलीसांनी सुरुवात केली असुन पहिल्याच दिवशी 13 व्यवसायिकानी संचारबंदीचा (Night curfew) भंग केल्यामुळे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या व्यवसायिकांत खालील लोकांचा समावेश आहे.
1)सय्यद ईर्शाद अली, वय 29 वर्ष रा. अजिजपुरा यांंचे महाराष्ट्र चायनिज चिकन हॉटेल,
2) किरण राजाभाऊ खडके, वय 22 वर्ष रा. प्रशांतनगर यांचे तुळजाई ॲटो गॅरेज बीड रोड, 3) बाबासाहेब मोहनराव यादव, वय 43 वर्ष रा. उमरी याचे वृंदावन हॉटेल बीड रोड,
4) शेख फुरखान मुस्ताक, वय 32 वर्ष रा. रोजा मोहल्ला मुळ गाव मोमीन गल्ली धारुर याचे हॉटेल येरमाळा मच्छी,
5) सलमान अल्लबक्श शेख, वय 25 वर्ष रा. कोरेगाव यांचे हॉटेल जय हिंद,
6) सुरेश कुमार मंगीलाल जाट, वय 32 वर्ष रा. गोपाळपुरा कला राज्य राजस्थान यांचे भरकादेवी आईस्क्रीम, मस्साजोग बस स्टँड,
7) अशोक काशिनाथ घाटुळ, वय 35 वर्ष रा. मस्साजोग यांचे शिवनेरी पान सेंटर,
8) लहु बाबासाहेब चौरे, वय 22 वर्ष रा. बेलगाव यांचे मोरया गॅरेज,
9) मनोज रामराव सुर्यवंशी, वय 28 वर्ष रा. पिसेगाव यांचे हॉटेल कन्हैय्या,
10) अरुण दयावान चाटे, वय 50 वर्ष रा. तांबवा यांचे हॉटेल रेणुका पिसेगाव फाटा,
11) मिनाज कुरेशी शब्बीर कुरेशी, वय 20 वर्ष रा. रोजा मोहल्ला गल्ली केज यांचे शालीमार बिर्याणी हॉटेल,
12) शेख महेबुब शेख गुलाब, वय 19 वर्ष रा . साळेगाव यांचे पान स्टॉल
13) किशनलाल मोतीजीलाल गाडरी, वय 28 वर्ष, रा. साळेगाव, मूळ गाव राजस्थान यांचे भैरवनाथ आईस्क्रीम गाडा साळेगाव
या तेरा जणांवर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही केली आहे. तसेच यापुढेही व्यवसायिकांनी आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊन (lockdown) काळातही केज पोलीस व महसुल व नगर पंचायत विभागाने सतत शहर व तालुक्यात पाळत ठेवून नियमभंग करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उभारला होता. केज तालुक्यात सध्या कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासन सतर्कता बाळगत आहे.
दुसरीकडे केज शहराजवळच असलेल्या किल्लेधारूर तालुक्यात मात्र प्रशासनाची चुप्पी असल्याचे दिसत आहे. व्यापारी वर्ग स्वंयस्फुर्तिने शासनाचे नियम पाळत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र, सोमवार व शुक्रवार या आठवडे बाजार दिवशी चक्क बाजारात नसते तेवढी गर्दी दिसुन येत आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊन (lockdown) काळातही मोठ्या प्रमाणत गर्दी दिसुन आली. परिस्थितीनूसार कोणतेही सोशल डिस्टंस वा मास्कचे नियम पाळले जात नाहीत.
हा प्रकार स्थानिक नगर परिषद, पोलीस व महसुल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देवूनही प्रशासनाकडून चुप्पी साधण्यात आली. ‘जान है तो जहाँ है’ म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. धारुर शहरात काही तुरळक व्यवसायिक नियमभंग करत असले तरी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केल्याचे दिसत आहे.