महाराष्ट्रात एका दिवसात तब्बल 249 मृत्यू तर 43 हजारावर नवीन रुग्णांचा उच्चांक

मुंबई दि.2 एप्रिल- महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक भागात लॉकडाऊन व अंशतः लॉकडाऊनसह कठोर निर्बंध लादण्यात आली आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 249 कोरोना बाधितांच्या मृत्यूची तर 43 हजार 183 नवीन रुग्ण आढळून येण्याचा नवीन उच्चांक गाठला आहे.
(In Maharashtra, 249 deaths and 43,000 new patients were recorded in a single day)
महाराष्ट्रात (Maharashtra) गुरुवारी 32,641 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी परतली आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2% एवढे झाले आहे. गुरुवारी राज्यात 43,183 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात गुरुवारी 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,99,75,341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,56,163 (14.30 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19,09,498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 18,432 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गुरुवारी राज्यात आढळून आलेल्या 43,183 नवीन रुग्णांसह आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 28,56,163 झाली आहे. गुरुवारी राज्यात एकट्या मुंबईत 8,646 नवीन रुग्ण आढळली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.