मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे व खा.डॉ. प्रितम मुंडे आज गहिनीनाथगडावर….

पालकमंत्री मुंडेंचा बीडमध्ये जनता दरबार

बीड दि.५(प्रतिनिधी)- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येऊन संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित महापूजेस आज शुक्रवार दि.०५ रोजी उपस्थित राहत आहेत. तर भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे (Pritam Munde) यांचीही गहिनीनाथ गडावर उपस्थिती राहणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे हे दुपारी २ वाजता राष्ट्रवादी (NCP) भवन येथे जनता दरबार घेणार आहेत.

गेली अनेक वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७.०० वा. या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे याच परिसरातील श्री क्षेत्र हनुमानगड येथेही दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर दुपारी २.०० वा. बीड शहरातील डीपी रोड येथील डॉ. गणेश राऊत यांच्या श्री.विश्ववेद अमृत चिकित्सालय या आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते होणार असून, दुपारी अडीच वाजल्यापासून ते राष्ट्रवादी (NCP) भवन, बार्शी रोड बीड येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत नागरिकांच्या भेटींसाठी उपलब्ध असतील. तद्नंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट व काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे आज शुक्रवारी गहिनीनाथ गडावर येणार आहेत. थोर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्या उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा गहिनीनाथ गडावर संपन्न होत आहे, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीला गडावर येण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची परंपरा पंकजा मुंडे यांनी जोपासली असून दरवर्षी त्या दर्शनासाठी गडावर येतात. एक भक्त म्हणून गडावर विविध विकास कामासाठी त्यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी दिला होता. सकाळी ११ वाजता पंकजा मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे (Pritam Munde) यांचे गडावर आगमन होणार असून दर्शन व किर्तनाच्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!