धारुरमध्ये आज ४ पॉझिटीव्ह; बीड जिल्ह्याची संख्या ३८२६… ९९ मृत्यू

किल्लेधारूर दि.२३ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या ३९ अहवाला पैकी शहरातील २ व तालुक्यातील २ जन असे ४ पॉझिटीव्ह आली आहेत. जिल्ह्याची आजपर्यंतची पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३८२६ तर मृतांची संख्या ९९ झाली आहे.
आज तालुक्यात २४ व्या दिवशी ४ रुग्णांची भर पडली आहे. तर शहरात दोन व तालुक्यात दोन सहवासित पॉझिटीव्ह आढळली आहेत.यात
१) ६५ वर्षीय पुरुष (अहिल्यानगर, कसबा, धारुर शहर, सहवासित )
२)८ वर्षीय स्त्री,(वडगावकर गल्ली, धारुर शहर, सहवासित )
३)५० वर्षीय स्त्री,(मैंदवाडी ता. धारुर, सहवासित)
४)३८ वर्षीय पुरुषा,(उमरेवाडी ता. धारुर, ह.मु.अंबाजोगाई , सहवासित)
यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ३८२६ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६८० आहे. जिल्ह्यात ९५ तर इतर जिल्ह्यात नोंद झालेले ४ असे ९९ मृत्यू पोर्टलवर नोंदवण्यात आली आहेत. रुग्णालयातून बरे होवून गेलेल्या रुग्णांची संख्या २०५१ असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.