कोरोंना विशेष

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 52 जण कोरोना पॉझिटीव्ह.

मुंबई दि.27 डिसेंबर – हिवाळी अधिवेशनात (Winter Session) कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (K. C. Padvi) यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यासह एकूण 52 जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

(Including Minister for Tribal Development K. C. Padvi 52 corona positive)

राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Third wave) येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ओमिक्राॅनचे (Omicron) रुग्णही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनात येणाऱ्यांची कोरोना चाचणी (Corona Test) केली जात आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री (Minister for Tribal Development ) के.सी. पाडवी यांच्यासह 52 जण कोरोना पाॅझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत.

दरम्यान, राज्यात ओमिक्रॉन (Omicron) रुग्णवाढीचा वेग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण 31 नवे ओमिक्रॉन बाधित रुग्ण काल आढळले. या 31 रुग्णांपैकी 27 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आले आहेत. पुणे ग्रामीण व अकोला ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव
दरम्यान, पुण्यातील (Pune) एका नामांकित महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोथरुड येथील एमआयटीच्या (MIT) मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाविद्यालयात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असूनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अहमदनगरमध्ये जवाहर नवोदय विद्यालयात 53 पॉझिटीव्ह …
अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय या शाळेतील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता याच शाळेतील आणखी 33 विद्यार्थ्यांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. तसेच एका शिक्षकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 53 झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!