धारुर शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली तर एक दुचाकी पळवली; अवकाळी पावसाने परिसराला झोडपले.

किल्लेधारुर दि.1 मे – शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकळ घालत चार दुकाने फोडत एक दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. शटरचे कान कात्रीच्या सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश करुन ह्या चोऱ्या (Thefts) केल्या असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आज महाराष्ट्र दिनी शहर व परिसराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला असून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
(In Dharur city, four shops were blown up in one night and one bike was stolen; Untimely rains lashed the area.)
किल्लेधारुर शहरात मागील काही काळात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या चोरीचा तपास लागत नाही तोच रात्री शहरात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शुक्रवारी शहरातील तेलगाव रोड वरील सोन्याचे प्रविण ज्वेलर्स आणि त्यालाच लागुन असलेले आयुषी मेडीकल, राज मेडीकल व गायकवाड गल्लीतील भगवान किराना दुकाना या दुकानाच्या शेटरचे कान मोठ्या कातरीच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन येथील चिल्लर व नोटा मिळुन नगदी सहा हजार रुपयाची चोरी केली आहे. तर राज मेडीकल येथील नगदी रक्कम चोरी गेली आहे. इतर दुकानात चोरट्यांना नगदी पैसेच मिळाले नाही म्हणून ते रीकाम्या हाताने परतले. तर गायकवाड गल्ली येथील शिवाजी फावडे यांची हीरो होंडा पॕशन प्रो गाडी चोरट्यांनी पळवली आहे.
एकाच रात्री पाच ठिकाणी चोरट्यांनी चोऱ्या (Thefts) केल्या असल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना (Police) मिळाले आहे. सध्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असून आधीच व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. सदरील चोऱ्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी (Police) तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
अवकाळी गारपीट पावसाने आंबा, डाळिंब, फळबागा उद्ध्वस्त…
आज शनिवार दि.1 रोजी दुपारी दोन तासाहून अधिक काळ अवकाळी पावसाने (Untimely rains) शहरासह तालुक्यातील अनेक भागांत हजेरी लावली. या अवकाळी पाऊस व गारपिटीचा (Hail) जोरदार तडाखा बसला. परिसरात सोसाट्याचा वारा, बोराएवढ्या गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले.
किल्लेधारूर शहरातही दुपारी साडे बारानंतर ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग वाढला मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तालुक्यासह व परिसरात गारपीट झाल्याने शेतीसह, घराची ही पडझीची नुकसान झाले माहिती मिळत आहे. दरम्यान, आणखी दोन दिवस ही स्थिती राहणार आहे. तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसासह गारपीट (Hail) झाली. शनिवारच्या या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाने (Untimely rains) किल्लेधारूर नगर परिषद व्यापारी संकुलातील जुन्या गाळे अर्धवट पडलेल्या दुकानात पाणी गेले त्यामुळे दुकान मालकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आज झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता गेल्या चार दिवसांपूर्वी पावसाळी वातावरण असेल मराठवाडा तसेच विदर्भातील काही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला होता.