किंचित वाढ … बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.10 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3445 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 168 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3277 जण निगेटिव्ह आली आहेत. काल पेक्षा आज रुग्ण संख्येत किंचित वाढ दिसुन आली. मात्र, जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे.
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-33, अंबाजोगाई-19, आष्टी-25, धारुर-6, गेवराई-15, केज-25, माजलगाव-12, परळी-9, पाटोदा-5, शिरुर-14, वडवणी-5 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घटली आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मागिल चार दिवसात संख्या उतरुन दिडशेच्या आत आली आहे. जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत.
दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच मंगळवारपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारी 10 हजार 989 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. बुधवारी 261 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.