जागतिक

India_Pakistan पाकिस्तानी शहरात बॉम्बस्फोटाची मालिका…

66 / 100 SEO Score

दिल्ली दि.8 मे – India_Pakistan अॉपरेशन सिंदूरचा धसका घेतलेल्या पाकिस्तानमध्ये काही वेळा पुर्वी दहा शहरात बॉम्बस्फोटाची मालिका दिसून आली. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अद्याप बॉम्बस्फोटाची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही.

काल भारताने पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान मधील अतिरेकीस्थळांना लक्ष्य करत अॉपरेशन सिंदूर राबवून 9 अतिरेकीस्थळं उध्वस्त केली. यानंतर आज पाकिस्तान मधील लाहोर, कराची, उमरकोट, सियालकोट, रावळपिंडी, गुजरानवाला, चकवाल, उमरकोट,शेखुपुरा, नरवाहृ आदी शहरात स्फोट झाले. या स्फोटात अनेकांचा जीव गेला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान पाकिस्तान आर्मीकडून पाकिस्तानच्या अनेक शहरात ड्रोन हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानात गृहयुध्दाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याघटनेनंतर पाकिस्तानमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!