कोरोंना विशेष

राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता- मंत्री छगन भुजबळ… नागरीकांनी काळजी घ्यावी- माधव निर्मळ

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केली. गेल्या दोन चार दिवसात देशासह राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता नागरीकांनी काळजी घेवून कोरोनाचे नियम पाळून संभाव्य धोका टाळावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक माधव निर्मळ (Madhav Nirmal) यांनी केले आहे.

आठ महिन्यापुर्वी देशात आलेल्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जून महिन्यापासून शासनाने अनलॉकची (Unlock) भुमिका घेतल्या नंतर जनजीवन पुर्वपदावर आले असतानाच गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोना (Corona) संक्रमण वाढत असल्याचे दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (Unicef) व भारतीय आरोग्य प्रशासनाने जनतेला धोक्याचा इशारा दिला आहे. कालच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहिर करत कोरोना (Corona) संक्रमण रोखण्यासाठी आवाहन केले आहे. देशात दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान नंतर महाराष्ट्रातल्या काही शहरात पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) शक्यता वर्तवली जात आहे. यातून स्वतःची काळजी घेवून जनतेने मास्क, सॕनिटायझर वापरुन गर्दी टाळण्याचे नियम पाळावीत असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक माधव निर्मळ (Madhav Nirmal) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!