कोरोंना विशेष

भारताची चिंता वाढली… दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनची भिती.

मुंबई दि.28 नोव्हेंबर – जग कोरोनाच्या डेल्टा (Delta virus) प्रकारातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच कोविड-19 च्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकाराने दार ठोठावले आहे. चिंतेची बाब म्हणजे, दि.27 रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक बंगळूरू विमानतळावर दाखल झाले असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

(India’s concern increased … two corona positive from South Africa; Fear of Omicron.)

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन (Omicron) प्रकार (B.1.1.529) हा चिंतेचा प्रकार (VOC) असल्याचं अवघ्या दोन दिवसांत घोषित केले आहे. डेल्टा व्हेरिएंट, ज्याने जगात सर्वात जास्त कहर केला होता, तो देखील यापूर्वी VOC म्हणून घोषित करण्यात आला होता. दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत (South africa) ओमिक्रॉन व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण नोंदवलं गेलं होतं. त्यानंतर त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

काय आहेत ओमिकॉर्न वेरिएंटची लक्षणे.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, Omicron प्रकारात अद्याप कोणतीही असामान्य किंवा नवीन लक्षणे दिसून आलेली नाहीत. याचा अर्थ असा की ओमिक्रॉन संसर्ग देखील मागील प्रकाराप्रमाणेच लक्षणे दर्शवित आहे. उदाहरणार्थ, ताप, खोकला, वास किंवा चव कमी होणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे इत्यादी लक्षणं आहेत.

ओमिक्रॉन जुन्या प्रकारापेक्षा वेगाने पसरतोय
डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हे कन्सर्नच्या जुन्या प्रकारापेक्षा वेगाने पसरत आहे आणि तो त्यांच्यापेक्षा जास्त प्राणघातक ठरू शकतो. WHO च्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी आधीपासूनच वापरल्या जात असलेल्या आरटीपीसीआर चाचणीची (RTPCR test) मदत घेतली जात आहे. अनेक प्रयोगशाळांनी असे सूचित केले आहे की या पीसीआर चाचणीमध्ये तीन लक्ष्यित जनुकांपैकी एकही शोधला जात नाही. ज्याला एस जीन ड्रॉपआउट किंवा एस जीन टार्गेट फेल्युअर असेही म्हणतात.

कोणती लस प्रभावी ?
कोविड-19 (Covid-19) च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराविरूद्ध ही लस प्रभावी आहे की नाही याबाबत लस उत्पादकांना अजूनही शंका आहे. हे शोधण्यासाठी फायझर आणि बायोएनटेक यांनी संशोधन सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचा लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या अनेक लोकांना संसर्ग झाला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर देशांमध्येही ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु असतानाच भारताची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून भारतात बंगळूरू (Bangalore) विमानतळावर दाखल झालेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोना बाधित आढळले आहेत.

नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली.
या नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी आता मुंबई महापालिका सरसावली असून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार असून त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!