भारताच्या नीरज चोप्राचा ‘सुवर्ण’ वेध; आज सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई, देशात जल्लोष.

टोक्यो दि.7 अॉगस्ट – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताने आज पहिल्या सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. आज भारताने एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. भालाफेक (Javelin throw) मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर दुसरीकडे प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे.

(India’s ‘golden’ vision of Neeraj Chopra; Earnings of gold and bronze medals in the country today.)

आज सुरुवातीला कुस्तीत (Wrestling) भारतानं कांस्य पदक मिळवल. कुस्तीपटू बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचा 8-0 ने पराभव केला. विशेष म्हणजे बजरंग पुनिया हा आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला आक्रमक कुस्ती खेळता आली नाही. दुखापत असूनही पुनियाने या सामन्यात कांस्य पदक मिळवत त्याने अनेक क्रिडाप्रेमींची मनं जिंकली आहेत.

पहिलं सुवर्ण पदक.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताने आज पहिल्या सुवर्ण पदक पटकावलं. विशेष म्हणजे हे सुवर्ण पाकिस्तानचा पराभव करत मिळालं. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देश समोर-समोर उभे ठाकले की टशन येतेच. दोन्हीकडील फॅन्स आपल्या खेळाडूंना आगदी मनापासून चेअर करतात.

शनिवारी या दोघांमध्ये अशीच टशन पहावयास मिळाली आहे. ती म्हणजे, टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक (Javelin throw) या प्रकारात अंतिम सामन्यात भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे जण भिडले आणि नीरजने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदक (Gold Medal) मिळवले आहे.

आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Olympic) मिळालेल्या सुवर्ण पदकाच्या कमाईनंतर देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन) कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ) पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे. तर रविकुमार दहियानेही कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. या पाठोपाठ आज नीरज चोप्रा (सुवर्ण) व बजरंग पुनिया (कांस्य) यांची भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!