शेती विषयक

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे … गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत प्रलंबित कुटूंबांना मिळणार लाभ.

बीड दि.01 मे – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विमा कंपनीशी करार नसलेल्या पाच महिन्याच्या खंडित काळातील अपघातात पात्र प्रकरणाची भरपाई ठरलेल्या राज्यातील 364 शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे सात कोटी 28 लाखाचा निधी शासनाने दिला आहे. यात बीड जिल्ह्यात 20 प्रलंबित खंडीत प्रकरणं आहेत. यामुळे प्रलंबित शेतकरी अपघात विमा (Farmer Accident Insurance) प्रकरण असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासांठी अनेक योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबवण्यात येतात. शेतात राबताना वेगवेगळ्या कारणाने अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू (Farmer Death) होण्याचे प्रकार घडतात. बऱ्याच वेळी एखाद्या शेतकऱ्यास कायमचे अपंगत्व येते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यावर कुटुंबाची मोठी वाताहत होते, आधार हरवतो. अशा वेळी त्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ( Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme ) सुरु केली आहे.

गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये व अपंगत्व आल्यास 1 लाखाचा विमा दिला जातो. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून आतापर्यंत लाखो शेतकरी कुटुंबाला आधार मिळाला आहे. शासन शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यासाठी विमा कंपनीशी करार करते. परंतू करार झाला नाही अशा खंडित काळात जे शेतकरी अपघात (Farmer accident) होतात, त्या पात्र कुटुंबाला भरपाई देण्यासाठी शासन निधी देते.

राज्यात 10 डिसेंबर 2020 त 6 एप्रिल 2021 या काळात विमा कंपनीशी (Insurance company) करार नव्हता. या खंडित काळात राज्यातील 364 शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव पात्र ठरले होते. मात्र त्यांना नुकसान भरपाई द्यायची राहिली होती. शासनाकडून त्यासाठी आता नुकतेच 7 कोटी 28 लाख रुपये मिळाले असून त्या-त्या जिल्ह्याला वर्गही झाले आहेत. त्यामुळे भरपाई प्रलंबित असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. खंडित कालावधीतील पात्र प्रकरणात बीड जिल्ह्यातील 20 पात्र प्रकरणे आहेत.

( Important for farmers … Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme pending families will get benefits. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!