इंदुरीकर महाराजांचा अपघात; ट्रॅक्टरला कारची धडक.

जालना दि.14 एप्रिल – ख्यातनाम कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या वाहनाला अपघात (Accident) झाला आहे. या अपघातातून ते बालंबाल बचावले. लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरला इंदुरीकर महाराज यांच्या कारची धडक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Partur) येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी निघाले असता ही घटना घडली. या अपघातात इंदुरीकर सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
परतूर येथील रस्त्याच्या एका वळणावर इंदुरीकर महाराज यांच्या वाहनाची आणि ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात इंदुरीकर महाराज सुखरुप आहेत मात्र त्यांच्या वाहन चालकाला किरकोळ दुखापत झालेली आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टरचालक आणि इंदुरीकरांचे वाहन चालक दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विनोदी आणि मार्मिक शब्दफेकीमुळे आपल्या खास शैलीमुळे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादही निर्माण झाले आहेत. खास करुन महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलन संघटनांच्या रडारवर इंदुरीकर महाराज नेहमीच असतात. नूकतेच त्यांनी माझे व्हिडीओ करुन वायरल करणाऱ्यांचे बरे होणार नाही असे वादग्रस्त विधान केले होते.
( Indurikar Maharaj’s accident; The car hit the tractor. )