केज व धारुरात पुन्हा दोन-दोन पॉझिटीव्ह; जिल्ह्यात ३८

बीडःदि.२ अॉगस्ट- आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा ३८ ने वाढला असून काल पाठवलेल्या अहवाला पैकी धारुर शहरात पुन्हा एक रुग्ण तर आज रॕपिड टेस्ट मध्ये एक असे दोन व केजमध्ये दोन रुग्ण आढळून आली आहेत. यामुळे शहरात गेल्या दोन दिवसात सहा पॉझिटीव्ह रुग्ण संख्या झाली तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या सात झाली आहे.
धारुर शहरात गेल्या दोन दिवासात चार तर आज एक असे पाच पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. आजच्या अहवालात क्रांति चौकात ५० वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यात आज ३८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली. यात बीडमध्ये १२, परळीत १७, केज ३, गेवराई व अंबाजोगाई प्रत्येकी २ तर माजलगाव व धारुरमध्ये प्रत्येकी एक असे ३८ व धारुर येथे रॕपिड टेस्टमध्ये एक पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या स्वॅब पैकी ५०२ चे अहवाल प्राप्त झाली आहेत. ३८ पैकी २२ रुग्ण पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या सहवासित आहेत.