आरोग्य

बीड जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव ; 24 तासात आढळले 7 रुग्ण.

51 / 100

बीड दि.2 अॉगस्ट – बीड जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव झाला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 7 ‘स्वाईन फ्लू’चे (Swine flu) रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात आता एकूण 9 रुग्ण संख्या झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
( Intrusion of ‘Swine Flu’ in Beed District; 7 patients found in 24 hours. )

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे . आज कोरोनाचे 12 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आठवडाभरात कोरोनाच्या नव्या 59 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या 47 ॲक्टीव रुग्ण आहेत. कोरोनाची (Corona) भीती कमी झाली असली तरी वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने (Health Department) बैठक घेऊन सर्वांनाच लसीकरणाचा टक्का वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत. लसीकरण (Vaccination) सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी ‘स्वाईन फ्लू’चे (Swine flu) दोन रुग्ण आढळले. त्यानंतर पुन्हा 109 लोकांचे स्वॅब घेतले असता त्यात एकाचवेळी तब्बल 7 लोक बाधित आढळले आहेत.

यामुळे आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेणे सुरू आहेत. दरम्यान, या सर्व रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे या सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र कोरोना व ‘स्वाईन फ्लू’चे वाढते रुग्ण पाहून, आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क झाला असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात गावागावात डूकरांची संख्या वाढली असून यावर स्थानिक प्रशासनाकडून अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!