कोरोंना विशेष

आज ५२ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा;

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) काल धारुरचे ५२ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा अहवाल रात्री प्राप्त होणार आहे. आज प्राप्त होणाऱ्या अहवालात शहरातील सर्वाधिक स्वॅब अहवालाचा समावेश आहे.

गेली ३० दिवस दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखलेत कालचा दिवस शहरातील केवळ एक स्वॅब असल्याने पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या शुन्य होती. काल शनिवारी धारुर तालुक्यातील  ३ पॉझिटीव्ह होते. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ५२ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. आज शहरात एक कोरोनाग्रस्त दगावल्याने येणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!