सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतले विषारी औषध; आत्महत्येनंतर चौघांवर गुन्हा नोंद.

केज दि.16 एप्रिल – सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून नाव्होली ता. केज येथील एका विवाहितेने विषारी औषध (Poison) प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबासाहेब घाडगे रा. लाखा ता. केज यांची मुलगी राधा हिचा विवाह केज (Kaij) तालुक्यातील नाव्होली येथील अशोक वामन वरपे सोबत रितीरिवाज प्रमाणे झाला. काही दिवस आनंदात गेल्यानंतर या विवाहितेस कन्या रत्न झाले. आनंदात संसार सुरू असताना राधाला पती अशोक वरपे, सासू, सासरा व नात्यातील महिला यांनी संगनमत करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रु. घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. या छळाला कंटाळून (दि.15) शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास राधा अशोक वरपे (रा. नाहोली ता. केज) या विवाहितेने विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी मयताचा भाऊ सागर घाडगे यांनी केज पोलिसांत तक्रार दिली आहे.

सागर घाडगे यांच्या फिर्यादी (Complaint) वरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 122/2022 भादवि 498(अ) 306,323, 504 व 34 नुसार मयताचा पती अशोक वामन वरपे, सासरा वामन दादाराव वरपे, सासु मीराबाई वामन वरपे आणि मावस सासु मंदाकीनी लक्ष्मण दातार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीसांनी (Police) पती व सासऱ्याला तात्काळ अटक केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

( Toxic drug taken by married woman after getting tired of father-in-law’s persecution; Crime recorded against four after suicide. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!