कोरोंना विशेष
धारुरला २ कोविड योध्दे पॉझिटीव्ह; जिल्ह्यात आजही सत्तरी पार

बीडः दि.१०आगस्ट- कालच्या प्रलंबित अहवालात धारुरहून पाठवलेली २६ अहवाला पैकी शहरातील २ पोलिस कॉन्स्टेबल हे कोविड योध्दे पॉझिटीव्ह आली आहेत. बीड शहरात ॲन्टीजन टेस्टमध्ये १३७ पॉझिटीव्हसह २३३ संख्या.
शहरात गेल्या दहा दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत आजही दोनने वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या सेवेत अहोरात्र झटणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. गेली दोन दिवस बीड शहरात व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट होत असुन यातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. कालच्या टेस्टमध्ये १३७ व्यापारी पॉझिटीव्ह आढळली आहेत. आजही जिल्ह्याची आकडेवारी २३३ झाली आहे. काल धारुर शहरातील ४५ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल आज रात्री मिळणार आहेत.