घात-अपघात

केजचे नेते हारुण इनामदार यांच्या गाडीला अपघात; पाथरीजवळ दोन वाहनांची धडक.

माजलगाव दि.19 मार्च – केज येथील जनविकास आघाडीचे नेते हारुणभाई इनामदार यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाला असून यात इनामदार हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरु आहेत.

केज (Kaij) नगर पंचायत निवडणूकीत यश मिळवणारे जनविकास आघाडीचे नेते हारुण इनामदार आज दि.19 शनिवारी केजहून परभणीकडे (Parbhani) निघाले होते. माजलगावहून परभणीकडे जात असताना ते प्रवास करीत असलेली स्कार्पियो गाडी व एका मालवाहू गाडीची पाथरीजवळ धडक झाली. यावेळी हारुण इनामदार यांच्यासह चालक व अन्य एक जण असल्याचे कळते.

या अपघातात हारुण इनामदार यांचा हात फ्रॕक्चर झाला असून चालकही किरकोळ जखमी आहे. त्यांना बीड (Beed) येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी धारुरमध्ये सत्कार...
शुक्रवार दि.18 रोजी हारुण इनामदार यांचा अल हबीब जकात फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने केज नगर पंचायत निवडणूकीत यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी इनामदार यांनी बोलताना केज, धारुर व कळंब या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
( Kaij leader Harun Inamdar’s car crashes; Two vehicles collided near Pathari. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!