केज, पाटोदा, अंबाजोगाई व धारुरकरांची चिंता वाढवणारी बातमी; पहा कोरोना मृत्यू दर

बीड दि.19 मार्च – सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उसळी घेतली असून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा वाढला आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू दर (Death rate) हा केज, अंबाजोगाई, पाटोदा व धारुर तालुक्यात असल्याचे दिसुन आले. जिल्ह्याचा मृत्यू दर 2.84 आहे. तर केज तालुक्याचा मृत्यू दर 4.6 टक्के, पाटोदा तालुक्याचा 3.78, अंबाजोगाई तालुक्याचा 3.76 तर त्या खालोखाल धारुर तालुक्याचा मृत्यू दर 3.46 आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या बीडचा मृत्युदर 2.32 टक्के आहे.

(Kaij, Patoda, Ambajogai and Dharurkar’s worrying news; See corona mortality)

बीड (Beed) जिल्ह्यात आतापर्यंत 598 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार 458 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले आहेत. यापैकी 19 हजार 736 कोरोनामुक्त झाले असून, 598 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड (Beed) जिल्ह्यात अगदी सुरुवाती पासूनच आरोग्य विभागाला कोरोना बळी रोखण्यात अपयश आलेले आहे. आरोग्य विभागाने कोरोनामुळे मृत झालेल्या प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करणे बंधनकारक असून, त्यावर आधारित उपाययोजनाही करणे गरजेचे आहे.

आठवडाभरा पूर्वी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी 20 टक्के डेथ ऑडिट बाकी असल्याची कबुली दिली होती. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे बीड तालुक्यात आहेत. बीड तालुक्यात तब्बल 150 मृत्यूची नोंद तर त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात 109 मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झालेली आहे. केज तालुक्यात आतापर्यंत केवळ 56 मृत्यूची नोंद असली तरी एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेतील मृत्युदर (Death rate) हा सर्वाधिक आहे. सर्वात कमी 1.51 मृत्युदर हा वडवणी तालुक्याचा आहे.

तालुकानिहाय मृत्युदराची आकडेवारी
(कंसातील आकडे मृत्यू दर्शवतात)
तालुका -रुग्णसंख्या- मृत्यू -टक्का
केज            1380   (56) 4.6%
पाटोदा           662   (25) 3.78%
अंबाजोगाई   2897 (109) 3.76%
धारूर            897   (31) 3.46%
गेवराई         1216   (42) 3.45%
परळी          2253   (64) 2.84%
माजलगाव    1595  (45) 2.82%
बीड             6481 (150) 2.31%
आष्टी           2104 (47) 2.23%
शिरुर             809 (16) 1.98%
वडवणी          664 (10) 1.51%

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!