केज तालुका हादरला… संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह; घातपाताचा संशय.

केज दि.20 अॉक्टोंबर – केज (Kaij) तालुक्यातील दैठणा येथे विलास बबन मुळे (38) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून सदरील प्रकार घातपात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

(Kaij taluka shaken … Body found in suspicious condition; Suspicion of assassination.)

केज तालुक्यात सध्या गंभीर गुन्ह्यांत वाढ दिसून येत आहे. काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या शोषणासह खुन, बलात्कार सारखे गुन्हे घडली आहेत. यातच आज विलास बबन मुळे यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून मृत व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून येत असल्याने सदरील प्रकार हा खूनाचा (Murder) असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक (PSI) दादासाहेब सिद्धे यांनी दिली. सदरील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!