करुणा मुंडे-शर्मा प्रकरणाला वेगळे वळण; ओडिओ व व्हिडीओ क्लिपमुळे खळबळ.

परळी दि.6 सप्टेंबर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांच्या गाडीत पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी (Atrocity) व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. मात्र कालच्या नाट्यमय घडामोडी कॕमेऱ्यात कैद झाल्या. यातील करुणांच्या गाडीत अज्ञात महिला वस्तू ठेवताना चा व्हिडीओ व करुणा शर्मांच्या अज्ञात व्यक्तीसोबतची अॉडिओ क्लीप सध्या सोशल माध्यमात खळबळ माजवत आहे.

(Karuna Munde-Sharma case takes a different turn; Excitement due to audio and video clips.)

रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्मा व मुंडे समर्थक महिलांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. शर्मा यांना त्यांच्या गाडीत बसवून शहर ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या गाडीच्या झडतीत डिकीत पिस्तुल (Pistol) आढळले. ते पोलिसांनी (Police) जप्त केले आहे. शर्मा यांच्या गाडीच्या चालकाचीही चौकशी केली.

दरम्यान विशाखा घाडगे यांनी शर्मा व अरुण मोरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, वैद्यनाथ मंदिरासमोर घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ का करता, असे विचारल्याने शर्मा यांनी बेबी तांबोळी यांना ओढून खाली पाडले तर अरुण मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पाेटावर चाकूने वार केला. जखमी तांबोळींवर अंबाजोगाई येथील स्वाराती (SRTR) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरुन ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल
करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अॉडिओ क्लीप व्हायरल
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीत तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याच्या व्हिडिओ पाठोपाठ आता करुणा शर्मा यांची अॉडिओ क्लीप (audio clip) व्हायरल झाली आहे. या अॉडिओ क्लीपमध्ये करुणा शर्मा व एका अज्ञात व्यक्तीचा संवाद कैद झाला आहे. या क्लीपमुळे करुणा यांचा सदरील प्रकार हा धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेलिंग (Blackmailing) करण्यासाठीचा असल्याची चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!