करुणा शर्मा प्रकरण; देवेंद्र फडणवीस पाठोपाठ निलेश राणेंनी केले मोठे विधान.

बीड दि.7 सप्टेंबर – पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल (Video viral) झाल्याने एकच खळबळ उडाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया देत प्रकरण गंभीर असून व्हिडीओची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यापाठोपाठ भाजपाचे माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) व्हिडीओ बाबत ट्विट केले आहे.
(Karuna Sharma case; Nilesh Rane made a big statement after Devendra Fadnavis.)
रविवारी करुणा शर्मा (Karuna Sharma) या परळीत आल्या होत्या. शहरात प्रवेश करताच काही लोकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. मोठा जमाव शर्मा यांच्या गाडीभोवती जमा झाला. त्यामुळे त्यांची गाडी भर बाजारात थांबली होती. त्यानंतर शर्मा या पुढे निघून गेल्या.
व्हिडीओत नेमकं काय ?
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी हवी- फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल (Pistol) हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय आहे निलेश राणेंचं ट्विट ?
करुणा शर्मांची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी (Police custody) देखील सुनावली गेली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने पिस्तुल ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.