करुणा शर्मांच्या जामिनावर होणार सोमवारी निर्णय; काय झालं न्यायालयात पहा…

बीड दि.18 सप्टेंबर – करुणा शर्मा यांच्या जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम दोन दिवस वाढला आहे.
(Karuna Sharma’s bail to be decided on Monday; See what happened in court …)
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.
करुणा शर्मां (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह एकावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी (Police) त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक होवून दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली होती.
त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर (bail) सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.