दगड फोडणाऱ्या वडार समाजाला मानवलोकची मदत

किल्लेधारूर दि.२३(वार्ताहर) दगड फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवरणाऱ्या धारूर शहरा लगत असणाऱ्या वडार समाजातील १८ कुटुंबाना मानवलोकने या कठीण काळात जिवनावश्यक वस्तूचा पूरवठा करून मदतीचा हात दिला.
मानवलोक या संस्थेने कोरोना प्रादूर्भाव रोकण्यासाठी असणाऱ्या कठीण काळात तालूक्यात अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे. मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहीया यांनी स्वतःलक्ष देऊन गरजूच्या मदतीसाठी व प्रशासनास सहकार्य करण्या करता पुढाकार घेतला. सहा महिने दगड फोडून तर सहा महिने ऊस तोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडार समाजाचे १८ कुटुंबावर लाॕकडाऊन मुळे काम बंद झाल्याने हे अडचणीत आले होते.
मानवलोकचे कार्यकर्ते लखन सिरसट व आश्रूबा घोडके यांनी या भागात सर्व्हे करून अशी कुटुंब निवडली. या १८ कुटूंबाना मानवलोकच्या वतीने सर्व जिवनवाश्यक वस्तूचा समावेश असणाऱ्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. सर्वांनी शासकीय नियमाचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पञकार अनिल महाजन, ग्रामसेवक संजय देशमूख, अतुल शिनगारे, लखन सिरसट, आश्रूबा घोडके, सुनिल तोंडे, जायभाये आदी उपस्थीत होते.