Kerala Malappuram बोट उलटून 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू .

मलप्पूरम दि.8 मे – Kerala Malappuram बोट उलटून 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना केरळमधील मलप्पूरम येथे घडली असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. Kerala Malappuram .. More than 20 tourists have died after a Kerala boat overturned in Malappuram, Kerala, and the death toll is feared to rise.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे केरळमधील Kerala Malappuram मलप्पूरम जिल्ह्यातील तनूर येथे समुद्रात अनेक जण फिरायला गेले होते. एका बोटमध्ये जवळजवळ 40 पर्यटक रात्री समुद्रात फिरायला गेलेले असताना मोठी दुर्घटना घडली. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून यामध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट दिली.
अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी माहिती देताना केरळमधील मलप्पुरम Kerala Malappuram जिल्ह्यातील या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री उशिरा झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि NDRF बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओवरुन समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी Narendra Modi यांनी केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत.